बीड

दिलासा:बीड जिल्ह्यात आज फक्त 20 कोरोना पॉझिटिव्ह

आज बीड जिल्ह्यात 603 अहवालात 20 जनांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 583 अहवाल निगेटिव्ह आले आहेत यात

अंबाजोगाई 3 आष्टी 2 बीड 9 केज 1 माजलगाव 2 परळी 1 वडवणी 2

राज्यात कोरोनाची स्थिती

महाराष्ट्र राज्यात काल 2438 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण आजवरच्या रुग्णांची संख्या ही 19,71,552 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात गेल्या 24 तासांत 4286 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 18,67,988 वर जाऊन पोहोचली आहे. काल राज्यात 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील एकूण मृतांची संख्या ही 50,101 वर जाऊन पोहोचली आहे. राज्यात सध्या 52,288 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.

देशातील कोरोनाची परिस्थिती

नव्या रुग्णांसहित देशातील आजवरच्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 1,04,79,179 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 18,385 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसहित देशातील एकूण आजवरच्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,01,11,294 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 167 रुग्णांचा मृत्यू झाला असून देशातील आजवरच्या एकूण कोरोना मृतांची संख्या ही 1,51,327 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात एकूण 2,16,558 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

error: Content is protected !!