बीड

बीड जिल्ह्यात आज 40 कोरोना पॉझिटिव्ह:सर्वाधिक रुग्ण बीडमध्ये

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 542 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 40 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 502 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.काल 25 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 16 हजार 192 कोरोना मुक्त झाले आहेत तर 17 हजार 39 बाधीत संख्या झाली आहे यात 540 जणांचा मृत्यू झाला आहे

आज दि 10 रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 4,आष्टी 6 बीड 24, केज 1 परळी 1पाटोदा 1,वडवणी 2 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ही १९ लाख ६५ हजार ५५६ वर पोहोचली आहे. तर याच काळात ५७ जणांचा मृत्यू झाला. या दिवसभरात राज्यात २ हजार ४०१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात कोरोनाचे ५२ हजार ९६० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
देशामध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला असून, कोरोनाचे रुग्ण आणि एकूण कोरोना बळींमध्ये महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे गेल्या एक दोन महिन्यांपासून राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत असून, कोरोनाची साथ नियंत्रणात आल्याचे संकेत मिळत आहे.