जमिनीचे क्षेत्र कमी दाखविण्यासाठी 50 हजाराची लाच:तलाठ्यासह सहाय्यक पकडला
केज : तब्बल ५० हजारांची लाच घेणाऱ्या लाचखोर तलाठ्यासह सहाय्यकास बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने येथील तहसीलच्या आवारातील टाकळी सज्जाच्या (अनधिकृत) कार्यालयाजवळ शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पडकले आहे.
तालुक्यातील टाकळी तलाठी सज्जाच्या कार्यक्षेत्रातील तक्रारदाराकडून सहायकाच्या माध्यमातून पाझर तलावात संपादित जमिनीसंबंधीच क्षेत्र कमी दाखविण्यासाठी तब्बल एक लाख रूपयांची लाच मागितली होती.
या तडजोड होऊन तडजोडीअंती सहायकाकडून पन्नास हजार रुपये स्वीकारताना शनिवारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने शनिवारी दुपारी पथकाने तलाठ्यासह सहायकास रंगेहाथ पकडले. तलाठी दयानंद शेटे (वय ५०) असे लाचखोर तलाठ्याचे तर, सचिन घुले (वय ३१) असे पकडलेल्या सहायकाचे नाव आहे. दोघा लाचखोराविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.