बीड

बीड जिल्ह्यात तीन ठिकाणी कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम

बीड, दि.८ (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यामध्ये शुक्रवारी तीन ठिकाणी कोरोना लसीकरणाची रंगित तालिम करण्यात आली. बीड जिल्हा रूग्णालय, परळीचे उपजिल्हा रूग्णालय आणि वडवणीच्या प्राथमिक रूग्णालयात प्रत्येकी २५ लाभार्थी निवडण्यात आले आणि लसीकरणाची रंगित तालिम करण्यात आली.

बीड जिल्ह्यामध्ये आज तीन ठिकाणी कोरोना लसीकरणाची रंगित तालिम करण्यात आली.कर्मचा-यांचा आत्मविश्वास वाढावा, लसीकरणाची प्रक्रिया सुरळीत व्हावीत या उद्देशाने ड्रायरन घेण्यात आला. प्रत्येक ठिकाणी २५ लाभार्थी निवडण्यात आले. या लाभाथ्र्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यांचे मॅपिंग करण्यात आले. लसीकरणाचे ठिकाण आणि वेळ निश्चित करण्यात आली. शितसाखळी केंद्राला सूचना देण्यात आल्या. पर्यवेक्षकाच्या जबाबदा-या निश्चित करण्यात आल्या. कोविड अ‍ॅपमध्ये काही त्रुटीतर नाहीत ना याची खबरदारी घेण्यात आली. तीनही ठिकाणी प्रत्येकी पाच अशा कर्मचा-यांच्या नियुक्ती करण्यात आल्या.

प्रत्येक ठिकाणी तीन कक्षाची स्थापना करण्यात आली. त्यात प्रतिक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरक्षण कक्ष याचा समावेश आहे. परळीच्या उपजिल्हा रूग्णालयात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते तर बीडच्या जिल्हा रूग्णालयात मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते ड्रायरनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपसंचालक डॉ.एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक सुर्यकांत गिते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिसन पवार आदी उपस्थित होते. मोहिम यशस्वी करण्यासाठी डॉ.संजय कदम, डॉ.बाबासाहेब ढाकणे, डॉ.सुधीर राऊत, डॉ.नरेश कासट, डॉ.मधुकर घुबडे, डॉ.तांदळे, डॉ.मोराळे आदी कर्मचाNयांनी मेहनत घेतली.