सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता होणार 28 टक्के:पण कधीपासून !
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात यापू्र्वी जुलै २०२० मध्ये ३ टक्के वाढ करण्यात आली होती. त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये महागाई भत्ता ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. मात्र करोनानं शिरकाव केल्यानंतर केंद्र सरकारच्या महसूलावर मोठा परिणाम झाला. तिजोरीला फटका बसल्यानं केंद्राने ही वाढ गोठवली होती. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणेच महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना १७ टक्के महागाई भत्ता मिळतो. आता एकत्रित ११ टक्के वाढीसह तो दिला जाणार असल्यानं नव्या वाढीनंतर तो २८टक्के होणार आहे.
महागाई भत्त्यात करण्यात येणाऱ्या वाढीचा फायदा केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या ५० लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्याचबरोबर ६० लाख निवृत्त कर्मचाऱ्यांनाही वाढीव महागाई भत्त्याचा लाभ होणार आहे. विविध राज्यांच्या कर्मचाऱ्यांनाही सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. महागाई भत्ता वर्षातून दोन वेळा वाढवला जातो. परंतु करोना संकटामुळे केंद्र सरकारच्या सरकारी तिजोरीवर परिणाम झाला. महागाई भत्त्यात जुलै २०२१ नंतरच वाढ होण्याची आशा व्यक्त केली जात आहे