बीड

बीड जिल्ह्यात आज 30 कोरोना पॉझिटिव्ह तर 17 कोरोना मुक्त

बीड जिल्ह्यात काल 17 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत 16 हजार 110 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. बीड जिल्ह्याचा करोनामुक्तीचा दर 95.14% टक्के झाला आहे.सध्या केवळ 277 जणांवर उपचार सुरू आहेत यात सर्वाधिक रुग्ण बीडमध्ये आहेत

आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 570 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 30 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 540 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

आज दि 5 रोजी आलेल्या अहवालात

अंबाजोगाई 11,आष्टी 4 बीड 10,परळी 2, शिरूर 1वडवणी 2 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत.