ऑनलाइन वृत्तसेवादेशनवी दिल्ली

लसीबाबत अफवावर विश्वास ठेवू नका:लस 110 टक्के सुरक्षित-डीसीजीआयचा खुलासा

सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या कोरोनावरील लसींच्या आपत्कालीन वापराला औषध नियंत्रकांनी (डीसीजीआय) परवानगी दिली आहे. त्यानंतर काही जणांनी लसीच्या प्रभावीपणाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच काही ठिकाणी या लसींवरून अफवा पसरवण्यात येत आहे. तर काही ठिकाणी लसीचे दुष्परिणाम साइड इफेक्ट होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. त्यावर डीसीजीआयने या लस 110 टक्के सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे.

कोरोनावरील लस घेतल्यानंतर नपुंसकता येत असल्याची अफवा देशातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात परसली आहे. कोरोनावरील दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात अफवा पसरत असून त्यात काहीही तथ्य नसल्याचे डीसीजीआयने स्पष्ट केले आहे.

लस घेतल्यावर नपुंसकता येते, ही बिनबुडाची, तथ्यहीन आणि खोडसाळपणाची अफवा आहे. त्यात काडीचेही तथ्थ नाही, असे डीसीजीआयने म्हटले आहे. अशा प्रकारच्या लसीबाबतच्या कोणत्याही अफवांवर जनतेने विश्वास ठेऊ नये, असे आवाहनही डीसीजीआयने केले आहे.

डीसीजीआयने ज्या दोन लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. त्या 110 टक्के सुरक्षित आहेत. लसींच्या सुरक्षितेतबाबत थोडासाही किंतु किंवा संशय असता, तर त्यांच्या आपत्कालीन वापराला परवानगीच देण्यात आली नसती, असे डीसीजीआयने स्पष्ट केले आहे. काही जणांना लस घेतल्यावर हलका ताप, डोकेदुखी किंवा एलर्जी असे किरकोळ त्रास होण्याची शक्यता आहे, असेही डीसीजीआयने स्पष्ट केले आहे.