बीड जिल्ह्यातून आज एकूण ७७ स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत.या पैकी ५० स्वॅब हे कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचे आहेत.यात इटकूरच्या रुग्णाच्या संपर्कातील आठ तर हिव-याच्या रुग्णाच्या संपर्कातील ४२ जणांचा समावेश आहे.कोरोनाबाधितांच्या संपर्कात नसलेले इतर कोरोनासंशयितांचे २७ स्वॅब आहेत. यात बीड जिल्हा रुग्णालयातून ११ , अंबाजोगाई स्वाराती रुग्णालयातून १५ तर परळी उपजिल्हा रुग्णालयातून ०१ व्यक्तीचा स्वॅब पाठवला आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५१० स्वॅब तपासले आहेत. या पैकी ४२४ निगेटिव्ह आहेत तर ०९ पाॅझिटिव्ह आज ७७ अहवालांची प्रतिक्षा आहे.