स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांनो फसवणुकीपासून सावध राहा;बँकेचे आवाहन
नवी दिल्ली/वृत्तसेवा
देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) त्यांच्या ग्राहकांना एक अलर्ट पाठवला आहे. एसबीआयने असं म्हटलं आहे की, आमचे कर्तव्य आहे की ऑनलाइन फसवणुकीपासून आम्ही ग्राहकांना सुरक्षित ठेवू. त्यामुळे बँकिंग संदर्भात काही टिप्स एसबीआयने ग्राहकांना दिल्या आहेत, ज्याचा वापर करून तुम्ही ऑनलाइन फ्रॉडपासून वाचू शकता. ही खबरदारी घेतल्यास तुम्ही खूप मोठ्या ऑनलाइन फसवणुकीपासून वाचू शकता आणि त्यामुळे तुमचे पैसे देखील वाचतील. एसबीआयने यासंदर्भात एक ट्विट देखील केले आहेत.
एसबीआयने ग्राहकांना दिला हा संदेश
हे आमचे कर्तव्य आहे की आम्ही तुम्हाला ऑनलाइन फ्रॉडचे शिकार होण्यापासून वाचवू. इथे बँकिंग संबंधित काही खबरदारी इथे देण्यात आल्या आहेत त्यांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
-हे आवश्यक आहे की तुम्ही नियमांचे पालन कराल आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीबरोबर तुमचे वैयक्तिक बँकिंग डिटेल्स शेअर करणार नाही
-ईएमआय, डीबीटी किंवा पंतप्रधान केअर फंड किंवा कोणत्याही केअर फंड संबधात ओटीपी मागणाऱ्या कोणत्याही अनौपचारीक लिंकवर क्लिक करू नका.
-जाहिरातींच्या माध्यमातून लॉटरी, रोख रक्कम किंवा नोकरीचं आमिष देणाऱ्या बनावट योजनांपासून सावधानता बाळगा.
-बँकेशी संबधित विविध गोष्टींचा पासवर्ड वेळोवेळी बदलत राहा.
-ही गोष्ट लक्षात ठेवाल की, कोणताही एसबीआय प्रतिनिधी त्यांच्या ग्राहकांकडे त्यांची वैयक्तिक माहिती, पासवर्ड, उच्च सुरक्षा पासवर्ड किंवा ओटीपीसाठी मेल/एसएमएस पाठवत नाहीत