वाहनधारकांना दिलासा:लायसन्स,आरसी बुकसह कागपत्रांची वैधता आता 31 मार्च 2021
कोरोना वायरस संकटकाळामध्ये आता केंद्र सरकारने वाहनांशी निगडीत नियम आणि कागदपत्रांच्या नियमांमध्ये पुन्हा शिथिलता देत वाहनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनांचं रजिस्ट्रेशन आणि फीटनेस सर्टिफिकेट्स यासारखी महत्त्वाची कागदपत्र आता रिन्यू करण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंतचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे तुमच्या कागदपत्रांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 पासून संपली असेल तरी त्याला 31 मार्च 2021 पर्यंत वॅलिड मानलं जाणार आहे. कोरोना वायरसच्या या काळात सरकारने हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आज काही वेळापूर्वीच Ministry of Road Transport & Highways ने याबाबत माहिती दिली आहे.
केंद्र सरकारकडून चौथ्यांदा अशाप्रकारे मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात सरकारने डॉक्युमेंट्स 31 डिसेंबर पर्यंत ग्राह्य धरले जातील असे सांगितले होते. त्यामुळे सध्या अनेकांची धावपळ सुरू होती. दरम्यान मीडीया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार काही कमर्शिअल वाहन मालकांनी काही काळ अजून सवलत मिळावी असे अपिल केले होते. यामध्ये काही वाहनं अद्याप उतरवू शकत नसलेल्यांचा समावेश होता. दरम्यान त्यामध्ये स्कूल बस ऑपरेटर्स देखील सहभागी होते.
फिटनेस सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी) सह प्रमुख कागदपत्र आता तुम्ही अपडेट केली नसली तरीही तुम्हांला घाबरून जाण्याची किंवा दंड भरावा लागण्याची काहीच गरज नाही.