जलयुक्तमध्ये 35 कोटींचा घोटाळाप्रकरणी बीडचे दोन अधिकारी निलंबित:मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता
बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेतील 35 कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी बीडमधील दोन कृषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या घोटाळ्याच्या चौकशीची घोषणा झाल्यानंतर झालेली ही पहिलीच कारवाई आहे. या कामांची खुली चौकशी पूर्ण झाल्यावर राजकीय नेतेही यामध्ये अडकले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेत घोटाळ्याच्या प्रकरणात काँग्रेसचे स्थानिक नेते वसंत पुंडे यांनी तक्रार केली होती. या कामातील कंत्राटदारांना डीबीए पेमेंटचा (थेट बँकेत पैसे जमा) पर्याय नसताना 138 ठेकेदारांना थेट डीबीए पेमेंट करण्यात आले अशी तक्रार होती. याप्रकरणी एक उपविभागीय कृषी अधिकारी व एक तालुका कृषी अधिकारी अशा दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.