देशनवी दिल्ली

“त्या’ बातमीत कोणतेही तथ्य नाही-शरद पवार यांचा मोठा खुलासा

पुणे – संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतेपद कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी लवकरच सोडणार असून त्यांच्याजागी सर्वानुमते महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार यांच्या नावाला मान्यता मिळत असल्याची बातमी दिवसभर चर्चेत होती. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुढे जात, लवकरच पवार देशाचे नेतृत्त्व सक्षमपणे करताना दिसतील, असे वक्तव्य केल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले.


मात्र, स्वत: शरद पवार यांनी म्हटले आहे की, युपीएचे अध्यक्ष बदलण्याची कोणतीही चर्चा कोणत्याही पातळीवर सुरु नसून, यासंदर्भात येत असलेल्या कोणत्याही बातमीत तथ्य नाही. खुद्द पवार यांच्याच स्पष्टीकरणाने या चर्चांना पूर्णविराम मिळाला असला, तरी त्यानिमित्ताने मोठी राजकीय खळबळही माजली होती.