बीड

मिक्सोपॅथी विरुद्ध आयएमएचे आंदोलन:11डिसेंबर रोजी बीड बंद!

बीड/वार्ताहर
19 नोव्हेंबर 2020 रोजी सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन द्वारा गॅझेटमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार मिक्सोपॅथी करण्याचा शासनाचा जो प्रयत्न आहे त्याच्या विरुद्ध आयएमएने देशभर आंदोलन चालू केले आहे .या विरोधात 11 डिसेंबर 2020 रोजी आयएमए ने बंद पुकारला असून सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोव्हिड-19 आणि आपत्कालीन सेवा वगळून अन्य सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत.

आयुर्वेद हा भारतीय परंपरेचा खूप मोठा ठेवा आहे व आपणा सर्व भारतीयांना त्याचा अभिमान आहेच .आयुर्वेद शास्त्राला आणखीन समृद्ध करण्याऐवजी मॉडर्न मेडिसिन मध्ये असलेल्या शस्त्रक्रिया करण्याची परवानगी आयुर्वेद मध्ये एमएस करणाऱ्या विद्यार्थ्यांना देऊन त्यांना मिक्सोपॅथी करण्यास शासन सांगत आहे.यातील बऱ्याच शस्त्रक्रिया या मॉडर्न मेडिसिन मधील गुंतागुंतीच्या असून त्यातील काही शस्त्रक्रिया या फक्त सुपर स्पेशालिस्ट करवी केल्या जातात. अशा शस्त्रक्रिया करताना रुग्णाच्या तब्येतीत गुंतागुंत होऊ शकते .त्यामुळे रुग्ण हिताच्या दृष्टीने शासनाने मिक्सोपॅथी करू नये व हे काढलेली ही अधिसूचना त्वरित मागे घ्यावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशन देशभर केली आहे व देशभर आंदोलन चालू आहे या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज दिनांक 8 डिसेंबर रोजी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आरोग्य मंत्री माननीय हर्षवर्धनजी यांना इंडियन मेडिकल असोसिएशन बीड शाखेतर्फे अध्यक्ष डॉ. अनिल बारकुल, सचिव डॉ. विनोद ओस्तवाल ,उपाध्यक्ष डॉ. अनुराग पांगरीकर ,सहसचिव डॉ. सुशांत योगे व कोषाध्यक्ष डॉ अमोल गीते यांनी मागण्यांचे निवेदन दिले आहे.

या आंदोलनाचा पुढील भाग म्हणून 11 डिसेंबर2020 रोजी देशभरातील सर्व आय एम ए मेंबरच्या सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोव्हिड-19 व आपत्कालीन सेवा सोडून बाकीच्या सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत
दिनांक 11 डिसेंबर 2020रोजी सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांच्या कोव्हिड-19 व आपत्कालीन सेवा वगळता इतर सेवा बंद राहतील
रूग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून रुग्णांच्या दीर्घकालीन हिताच्या दृष्टीनेच आम्ही हा लढा लढत असल्याचे आयएमएने कळवले आहे