देशातील सर्वात मोठ्या बँकेत पदभरती:अर्ज करण्यासाठी उरले फक्त दोनच दिवस
देशाची सर्वात मोठी सार्वजिक बँक एसबीआयला भविष्यात १४ ते १५ हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे. यासाठी एसबीआयने पहिल्या टप्प्यात निम्म्या जागा भरण्याचा निर्णय घेतला असून भरती सुरु करण्यात आली आहे. या भरतीचा १० डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे. म्हणजेच अर्ज करण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. इच्छुकांना लगेचच तयारी करून अर्ज भरावा लागणार आहे.
सध्या जगभरात लोकांवर आर्थिक संकट आलेले आहे. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. तसेच अनेक कर्मचाऱ्यांच्या पगारातही कपात झाली आहे. उद्योग-धंदे करणारे छोटमोठे व्यावसायिकही अडचणीत आहेत. एकूण जगभरात अशी परिस्थिती असताना नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
स्टेंट बँक ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटीस पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 डिसेंबर 2020 आहे. sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता.
पदाचे नाव – अप्रेंटीस
पद संख्या – 8500 (महाराष्ट्र 644) जागा. State Bank Of India Recruitment 2020
पात्रता – Graduation
वयाची अट – 20 ते 28 वर्षे
शुल्क – General/ OBC/ EWS – 300 रुपये
अर्ज सुरु होण्याची तारीख – 20 नोव्हेंबर 2020
अर्ज करण्याची शेवटची ता 10 डिसेंबर 2020