आगामी लोकसभेची प्लॅनिंग:जयसिंगराव गायकवाड बीडचे उमेदवार
बीड-राजकारणात कधी काय आणि कसे घडेल हे सांगता येत नाही,ऐन पदवीधर निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या माजीमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजप कमळाच्या सुगंधाला वैतागून वेळ साधण्यासाठी हाती घड्याळ बांधून घेतले आहे तसे पुढचे अंदाज आता लक्षात घेण्यासारखे आहेत आगामी लोकसभेच्या निवडणुकीची ही आतापासूनच तयारी म्हणावी लागेल कारण जयसिंगराव गायकवाड हे बीडचे 3 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत त्यामुळे आगामी लोकसभेचे तेच उमेदवार असतील असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे
जयसिंगराव गायकवाड पाटील उर्फ काका यांनी स्व प्रमोद महाजन आणि स्व गोपीनाथ मुंडे यांच्या बरोबरीने राजकारणात काम केले आहे पदवीधर निवडणुकीत देखील आमदार म्हणून निवडून आले आहेत तर 3 वेळा बीडचे खासदार म्हणून निवडून आले आहेत बीड जिल्ह्यात सामान्य माणसाच्या घरी त्यांचा मुक्काम आणि कामाची पद्धत बीडकारांना चांगलीच माहीत आहे वाड्या वस्त्या तांडे आणि गावोगावी जाऊन त्यांनी जनसंपर्क ठेवला आहे पक्ष कुठलाही असला तरी सामान्य माणसाला उपलब्ध असणाऱ्या नेता हवा असतो म्हणूनच पुन्हा एकदा जयसिंगराव गायकवाड हे बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील हे नक्कीच,त्यांनी मोठा पक्ष असणारा भाजप का सोडला असेल राष्ट्रवादी मध्ये त्यांना काय मिळणार?कुठे स्थान मिळणार या आणि अनेक प्रश्नांची उत्तरे आता स्पष्ट होऊ लागली आहेत गायकवाड यांनी केलेल्या कामाच्या जोरावर ते पुन्हा एकदा बीडकारांना साद घालू शकतात हे मात्र नक्की
कोण आहेत जयसिंगराव गायकवाड?
जयसिंगराव गायकवाड हे भाजपचे जुने आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी दिवंगत प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे यांच्यासोबत काम केले आहे. पक्ष संघटना वाढविण्यात गायकवाड यांचा मोठा वाटा आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून जयसिंगराव गायकवाड हे तीन वेळा भाजप तिकीटावर निवडूण गेले आहेत. तसेच, पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा ते विधानपरिषदेवर आमदार राहिले आहेत.