व्हॉट्सएपने आणले नवे फिचर्स:पर्सनल आणि ग्रुपसाठी Disappearing Messages
मुंबई : युजर्सना आकर्षित करण्यासाठी व्हॉट्सएप नेहमी स्वत:मध्ये अपडेट आणत असतं. यूजर्सला चॅटींग सोपी जावी यासाठी व्हॉट्सएप नवनवे प्रयोग करत असतं. नुकतेच व्हॉट्सएपने नवे फिचर्स आणलेतय. याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं.
Disappearing Messages हे नवे फिचर व्हॉट्सएपने आणलंय. यानुसार तुम्ही समोरच्या व्यक्तीला पाठवल्यास ७ दिवसांनी गायब होतो. हे फिचर पर्सनल आणि ग्रुप मेसेजसाठी उपयोगी आहे. पण केवळ ग्रुप एडमीन हे फिचर सुरु करु शकतो.
व्हॉट्सएप पेमेंट फिचर्सची देखील सध्या जोरदार चर्चा आहे. आता तुम्ही यूपीआयच्या माध्यमातून व्हॉट्सएप पेमेंट देखील करु शकतो. तुमच्या चॅटींगमध्ये हा पेमेंटचा पर्याय आलाय.
त्यामुळे तुम्ही कोणत्याही व्यक्तीला चॅटींग करताना पैसे पाठवू शकता.
व्हॉट्सएपच्या माध्यमातून तुम्ही खरेदी करु शकता हे खूप कमी जणांना माहितेय. व्हॉट्सएपने नुकतेच हे फिचर लॉंच केलंय. तुमच्या जवळच्या विभागात शॉपिंग मॉल आणि व्यवसाय सर्च करु शकता आणि सोप्या रितीने खरेदी देखील करु शकता.
जर तुम्ही ग्रुपमधील कोणाच्या बडबडीला कंटाळला असाल तर त्याला म्यूट करण्याचा पर्याय देखील तुमच्यासमोर आहे. म्हणजेच कोणत्या व्यक्तीला ब्लॉक करणं किंवा ग्रुपमधून काढण्याची गरज नाही. तुम्ही या व्यक्तींना कायम म्यूट करु शकता.
व्हॉट्सएपमध्ये रोज शेकडो मेसेजेस येतात. अशावेळी फोटो आणि व्हिडीओ डिलीट करणं खूप कठीणं होऊन जातं. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. व्हॉट्सएपमध्ये तुम्ही न आवडणारे बल्क मेसेज डिलीट देखील करु शकता.