बीड

विक्रीयोग्य कापसाची नोंदणी बाजार समितीकडे ३० नोव्हेंबर पर्यंत करा-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

बीड, दि. २२::–जिल्ह्यातील सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या विक्रीयोग्य कापसाची नोंदणी संबंधित बाजार समितीकडे ३० नोव्हेंबर, २०२० पर्यंत करावी. त्यानंतर शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार नसून ऑनलाईन नोंद केलेल्या शेतकऱ्यांना त्यांचे ऑनलाईन नोंदणी क्रमांकानुसारच तीन दिवस अगोदर कापूस विक्रीसाठी आणणेबाबत बाजार समितीकडून संदेश पाठवण्यात येईल असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.

जिल्ह्यातील हंगाम २०२०-२१ मधील कापूस खरेदीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली( दि. २१ रोजी) नियोजनासाठी बैठक झाली यावेळी प्रकाश आघाव पाटील, उपजिल्हाधिकारी, (सामान्य), विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या. विभागीय कार्यालय, परळी, विभागीय व्यवस्थापक, .सी. सी. आय, औरंगाबाद, तसेच जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांचे सचिव, उपविभागीय पोलिस अधिकारी व प्रवीण फडणीस जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड हे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, तसेच शेतकन्यांना (Bulk SMS) संदेश पाठविण्याची सुविधा बाजार समितीने तात्काळ उपलब्ध करून घ्यावी. ३० नोव्हेंबर, २०२० नंतर शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी.
एखाद्या शेतकर्यास वाहन उपलब्धतेअभावी लघुसंदेशात नमूद केलेल्या दिवशी कापूस आणणे शक्य न झाल्यास अशा शेतकऱ्यास कापूस आणणेसाठी पुढील तीन दिवस संधी देण्यात यावी. याउपरही त्या शेतक-याने कापूस न आणल्यास त्याचा नोंदणी यादीतील प्राधान्यक्रम संपुष्टात येत असल्याबाबत लघुसंदेशात स्पष्ट सूचना द्यावी. तसेच शेतकरी बाजार आवारात कापूस घेऊन आल्यानंतर संबंधीत शेतकऱ्याला त्याचा टोकन नंबर व त्या शेतकऱ्याने कापूस नोंदीवेळी दिलेली कागदपत्रे, आधारकार्ड, बँक पास बुक, अद्ययावत पीक पेय्राची नोंद असलेला ७/१२ च्या उतारा, इत्यादी कागदपत्रे त्यासोबत देण्यात यावीत. बाजार समितीने कोणत्याही परीस्थितीत ऑनलाईन नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना कापूस खरेदीसाठी टोकन देऊ नये, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सर्वांना दिल्या,

यावेळी अर्जुन दवे, विभागीय व्यवस्थापक, सी. सी. आय. औरंगाबाद यांनी बीड जिल्ह्यातील गेवराई, बीड व वडवणी या तालुक्यामध्ये सी. सी. आय. ची खरेदी केंद्र चालू करणार असल्याचे नमूद केले . बीड येथील खरेदी केंद्रांवर आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) या तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या, त्यापैकी गेवराई व बीड येथील खरेदी केंद्रावर प्रत्यक्ष खरेदी सुरु करण्यात आली आहे.

तसेच सदाशीव इंगळे, विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या.
विभागीय कार्यालय, परळी (वै) यांनी जिल्ह्यातील माजलगाव, धारूर व केज या तालुक्यात कापूस पणन महासंघाकडून खरेदी केंद्र मंजूर झालेली असून सदर खरेदी केंद्र सुरु करण्यास परवानगी मिळताच खरेदी केंद्र सुरु करण्यात येतील असे सांगितले. केज येथील खरेदी केंद्रावर केज व अंबाजोगाई तालुक्यातील शेतकन्यांच्या कापूस खरेदी करण्याच्या आणि धारूर तालुक्यातील खरेदी केंद्रावर धारूर व परळी तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

गेवराई बाजार समितीने ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना कापूस खरेदी केंद्रावर विक्रीसाठी
आणणेबाबत दररोज २५० शेतकऱ्यांना लघुसंदेश (एसएमएस) पाठविण्याच्या सूचना बाजार समितीला देण्यात आल्या आहेत. तसेच बीड येथील खरेदी केंद्रावर देखील दररोज २५० शेतकऱ्यांना लघुसंदेश (एसएमएस) पाठविण्याच्या सूचना बाजार समितीला देण्यात आल्या.

वडवणी तालुक्यातील खरेदी केंद्र हे दि. २६
नोव्हेंबर, २०२० पासून सुरु होणार असून कृषी उत्पन्न बाजार समिती, वडवणी यांना प्रति दिन १५० शेतकन्यांना लघुसंदेश (एसएमएस) पाठविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
त्या प्रमाणात ज्या शेतकऱ्याचा कापूस पेऱ्याच्या क्षेत्राप्रमाणे ४० क्विंटलपेक्षा जास्त आहे, अशा प्रत्येक शेतकऱ्याची ४० क्विंटलसाठी एकदा नोंद या प्रमाणात एकाच दिवशी ऑनलाईन नोंदी कराव्यात शेतकऱ्याकडून कागदपत्रांचे संच घेण्यात यावेत; परंतु प्रत्येक ४० क्विंटलसाठी त्या शेतकर्‍यास वेगवेगळ्या दिवसाचे टोकन व लघुसंदेश पाठविण्यात येईल.

बाजार समितीने यापुढे कापसाची नोंद करताना फक्त बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदी कराव्यात. बाजार समितीचे कार्यक्षेत्राबाहेरील किंवा शेजारच्या तालुक्यातील अथवा शेजारच्या जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदी करू नयेत,

जिल्ह्याबाहेरील शेतकऱ्यांच्या यापुर्वी ऑनलाईन नोंदी केलेल्या आहेत किंवा शेतकऱ्यांनी कागदपत्रे बाजार समितीकडे जमा केली आहेत, अशा शेतकऱ्यांची यादी संबंधीत बाजार समितीकडे वर्ग करण्यात यावी. सदरच्या शेतकऱ्यांना कापूस खरेदीचा संदेश देण्यात येऊ नये. सदर शेतकऱ्यांची कापूस खरेदी बीड जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये केली जाणार नाही.

तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस प्रतवारीकार यांनी नॉन एफ. ए. क्यू. म्हणून नाकारला असल्यास शासकीय खरेदी केंद्रावरील प्रतवारीकाराकडून नाकारण्यात आलेला नॉन एफ. ए. क्यू. दर्जाचा कापूस शेतकर्यास त्याच्या इच्छेनुसार परवानाधारक खाजगी व्यापारी किंवा जिनिंग प्रेसिंग फॅक्टरीस विक्री करण्यास मुभा राहील.

तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी यांना वेळोवेळी कापूस खरेदी केंद्रावर पेट्रोलिंग व काही आवश्यकतेप्रमाणे पोलीस बंदोबस्त पुरविणेबाबत सूचना दिलेल्या आहेत अशी माहिती प्रवीण फडणीस जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था बीड यांनी कळविली आहे .