वीज ग्राहकाला विनाकारण त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई होणार
लॉकडाऊन काळातील वीज बिल वसुलीसाठी महावितरणचा एखादा अधिकारी ग्राहकांना विनाकारण त्रास देत असेल किंवा वाढीव वीज बिल दुरुस्त करून न देता आधी बिल भरा मग दुरुस्ती करू असे म्हणत असेल तर त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ऊर्जामंत्री डॉ . नितीन राऊत यांनी दिला आहे
लॉकडाऊनमध्ये चार-पाच महिन्यांची एकत्रित विजबिले दिली आहेत. त्यामुळे अवाच्या सवा वीज बिल आल्याच्या तक्रारी ग्राहक करत आहेत. त्यामुळे वाढीव वीज बिल आले आहे अशा ज्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत, त्याच्या वीज वापराची खातरजमा करून बिल दुरुस्त करून देण्याचे निर्देश महावितरणला दिले आहेत.
तसेच बिलाची जादा रक्कम असेल तर तीन सामना हप्त्यात भरण्याची सोय करून देण्याचे निर्देश दिलेले आहेत.
त्यामुळे वाढीव वीज बिल आधी भरा, मग दुरुस्ती करू असे कोणी महावितरणचा अधिकारी म्हणत असेल, ग्राहकाला विनाकारण त्रास देत असेल तर ग्राहकांनी त्याची तक्रार महावितरणच्या संकेतस्थळावर किंवा ऊर्जा विभागाकडे करावी. त्याची खातरजमा करून संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले आहे. त्यामुळे वाढीव वीजबिल दुरुस्त करून देताना अडीबाजी करणाऱया महावितरणच्या अधिकाऱयांना चाप बसणार आहे.