बीड

बीड जिल्ह्यात दोन टप्प्यात शाळा सुरू करण्याचे आदेश

राज्य शासनाच्या दिनांक 10 नोव्हेंबर 2020 च्या परिपत्रकानुसार दिनांक 23 नोव्हेंबर पासून इयत्ता 9 ते 12 वी चे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे बीड जिल्ह्यात इयत्ता 9 ते 12 च्या एकूण 768 शाळा असून 6600 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आहेत या शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची covid-19 संदर्भातील rt-pcr चाचणी पूर्ण झालेली आहे त्यात शाळा पहिल्या टप्प्यात दिनांक 23 नोव्हेंबर 2020 पासून सुरू होणार आहेत

आज पर्यंत 2627 कर्मचाऱ्यांची rt-pcr चाचणी पूर्ण झालेली असून उर्वरित कर्मचाऱ्यांची चाचणी करण्याचे काम सुरू आहे चाचणी संबंधित काम दिनांक 24 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे उर्वरित शाळा दुसऱ्या टप्प्यात म्हणजे दिनांक 25 नोव्हेंबरपासून सुरू होतील

सर्व शाळांनी शासन परिपत्रक दिनांक 10 नोव्हेंबर 2020 मधील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे या शाळेतील कर्मचाऱ्यांची तपासणी पूर्ण झाली आहे त्या शाळांची यादी दिनांक 22 नोव्हेंबर पासून गटशिक्षणाधिकारी कार्यालयात उपलब्ध असणार आहे असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ विक्रम सारूक व प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी कळवले आहे