देश

आता ग्रामीण भागातही २४ तास वीज

ऊर्जा क्षेत्रासाठी 90 हजार कोटींचे अर्थसाह्य


नवी दिल्ली,
देशातील ऊर्जा क्षेत्राला आगामी काळात मोठा दिलासा मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे आता शहरांसोबत ग्रामीण भागातील गावांमध्येही 24 तास वीज उपलब्ध होणार आहे. यासाठी सरकारच्या मुख्य समस्यांवर नियंत्रण मिळवत त्यावर उपाय उपलब्ध करण्याची यंत्रणा राबविण्यात येणार आहे.

यासाठी केंद्र सरकारने वीज वितरण कंपन्यांना थकबाकीची पूर्तता करण्यासाठी पुन्हा एकदा 90 हजार कोटी रुपयांच्या आर्थिक निधीची घोषणा केली आहे.ग्रामीण क्षेत्रातील लोकांना 24 तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी आगामी काळात केंद्र सरकारतर्फे योजना आखण्यात येणार आहे. सध्या सर्वाधिक थकबाकी केंद्र सरकारच्या वीज कंपन्यांची असून चालू आर्थिक वर्षातील सुरुवातीचा कालावधी लक्षात घेतल्यास एप्रिल 2020 मध्ये केंद्र सरकारच्या वीज उत्पादक कंपन्यांची थकबाकी 40065.92 कोटी रुपयांची होती, जी एकूण थकबाकीच्या तुलनेत 40.73 टक्के आहे.अक्षय ऊर्जा स्रोतही अडचणीत
पवन चक्की तसेच अक्षय ऊर्जा निर्मिती करणार्‍या कंपन्यांना भारतात विशेष दर्जा आहे. याच कंपन्या पर्यावरणाचा समतोल कायम राखत वीज उत्पादन करून ग्राहकांना सेवा देत असतात. परंतु वीज बिलाच्या थकबाकीमुळे व कर्जामुळे या कंपन्यांचेही गणित पूर्णपणे मोडून पडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *