ऑनलाइन वृत्तसेवा

घर खरेदीसाठी गृह कर्जात एसबीआयची खास ऑफर

मुंबई : जर तुम्ही घर विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी दिवाळी डील आणि ऑफर आणल्या आहेत. यामध्ये SBI ने ग्राहकांना गृहकर्ज दरामध्ये 0.25 टक्के सूट देणार आहे. इतकंच नाही तर बँक प्रक्रिया शुल्कही आकारणार नाहीये. SBI मध्ये गृहकर्ज घेण्यासाठी सुरवाती वार्षिक व्याजदर 6.90 टक्के आहे. हा व्याज दर 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर लागू होतो.

काय आहे एसबीआयची खास ऑफर ?

  • एसबीआयमध्ये सुरवाती गृहकर्जावर 6.90 टक्के व्याज दर मिळणार
  • सणासुदीत बँक व्याज दरावर 0.25 टक्के सवलत मिळेल
  • प्रक्रिया शुल्क 100 टक्के माफ केलं जाईल
  • योनो (YONO) अॅपवरून अर्ज घेतल्यावर खास सवलती मिळणार आहेत.
    30 लाखांच्या गृह कर्जावर एसबीआय खूपच कमी व्याज दर देत आहे. यामुळे ग्राहकांना याचा चांगला फायदा मिळणार आहे. इथं व्याज दर 6.90 टक्क्यांपासून सुरू होतं. इतकंच नाही तर 30 लाख रुपयांपेक्षा जास्त गृह कर्जावरील व्याज दर 7 टक्के असेल.

एसबीआयच्या गृह कर्जावर ग्राहकांना 75 लाख रुपयांपर्यंतच्या घर खरेदीसाठी 0.25% व्याज सवलत मिळणार आहे. ही सूट सीआयबीआयएलच्या स्कोअरवर आधारित असेल आणि योनो अॅपद्वारे अर्जावर उपलब्ध असणार अशी माहिती बँकेकडून देण्यात आली आहे