वृत्तसेवा

ग्राहकांच्या खात्यात सहा महिन्याचे चक्रवाढव्याज भरणा सुरू

मुंबई – सवलतीच्या काळात कर्जाचा हप्ता दिलेल्या आणि न दिलेल्या ग्राहकांच्या खात्यात सहा महिन्याचे चक्रवाढव्याज भरणे बॅंकांनी सुरू केले आहे.

बॅंकांना ही रक्कम नंतर केंद्र सरकार देणार आहे. व्याज माफ करण्याची गरज असल्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यानंतर केंद्र सरकारने चक्रवाढ व्याज ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाणार असल्याचे सांगितले आहे.

यानुसार बॅंका चक्रवाढव्याज ग्राहकांच्या खात्यात जमा करीत आहेत आणि त्या संदर्भात ग्राहकांना एसएमएस पाठवून माहिती देत आहेत. हे प्रकरण आणखीही न्यायालयात असून गुरुवारीही या विषयावर सुनावणी होणार आहे.