वीज बिलात सूट मिळण्याची शक्यता:उद्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव दाखल
लॉकडाऊनच्या काळात घराघरात विजेची वाढीव बिले आली. या वाढीव वीज बिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी वीज ग्राहकांना आता वीज बिलात सूट मिळण्याची शक्यता आहे.
वीज बिलास सूट देणारा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.
कोरोना काळात राज्यातील जनतेला भरमसाट वीज बिले गळ्यात मारणाऱया ऊर्जा मंत्रालयाने आजतागायत लोकांना यातून दिलासा दिलेला नाही. वीज बिलात सर्वसामान्य लोकांना सवलत देण्याचा प्रस्ताव ऊर्जा खात्याने बनविला आहे. त्यामुळे लोकांना वीज बिलात दिलासा देण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल, असे ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले.