यापुढे वकील पांढऱ्या शुभ्र कपड्यात दिसणार
नवी दिल्ली : करोनाने सर्वसामान्यां पासून सर्वांचेच आयुष्य बदलले आहे. अनेक गोष्टींमध्ये मोठ्याप्रमाणात बदल झाले आहेत. यातच आता सर्वोच्च न्यायालयानेही आपल्यामध्ये मोठे बदल केले आहेत. कारण न्यायालयाकडून वकिलांचा पोषाख बदलण्यात आला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर वकिलांना (Virtual Court System) आभासी सुनावणीदरम्यान अंगात काळ्या रंगाचा कोट किंवा रोब घालण्याचं बंधन नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयासमोर युक्तीवाद करणारे वकील केवळ पाढरा शर्ट आणि नेक टाय वापरु शकतील, त्यावर काळा कोट घालण्याची गरज नाही. करोनाचा फैलाव रोखण्यासाठीची उपाययोजना म्हणून सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरत्या स्वरुपात हा निर्णय जाहीर केला
Advocates may wear “plain white-shirt/white-salwar-kameez/ white saree, with a plain-white neck band” during hearings before the Supreme Court through Virtual Court System till medical exigencies exist or until further orders: Supreme Court in a circular dated May 13 #COVID19
यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक निवेदन जाहीर केले आहे. यामध्ये , व्हर्चुअल कोर्ट सिस्टिममध्ये सुनावणीदरम्यान, वकील मंडळी प्लेन पांढरा शर्ट, पांढरी सलवार-कमीज, पांढरी साडी तसेच गळ्याभोवती प्लेन पांढरा नेकबँड वापरु शकतात. जोपर्यंत करोना संदर्भातील परिस्थिती कायम आहे किंवा पुढील आदेश येईपर्यंत ही सवलत देण्यात आली आहे. वैद्यकीय सल्ल्याला अनुसरुन हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सांगण्यात येत आहे.