महाराष्ट्र

पोलिसांच्या १०० नंबरवर आले ‘इतके’ हजार कॉल्स

मुंबई – कोरोना संकट थोपवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दिवस-रात्र राबताना दिसत आहेत. अशातच कोरोनाच्या या लढ्यामध्ये पोलीस विभागाचा १०० नंबर देखील अविरत सुरु असून या क्रमांकावर लॉक डाऊनच्या काळात नागरिक मोठ्या प्रमाणात फोन करत आहेत. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार लॉक डाऊनच्या काळामध्ये १०० नंबरवर आतापर्यंत ८४,९४५ फोन आले आहेत.याबाबतची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली असून यावेळी त्यांनी लॉक डाऊनच्या काळात घडलेल्या इतरही घडामोडींबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे लॉक डाऊन सुरु झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भातील ९५ हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

पोलिसांवर हल्ल्याच्या १८४ घटना राज्यात लॉक डाऊनच्या कालावधीमध्ये पोलिसांवर  हल्ला होण्याच्या १८४ घटना घडल्या असून यामध्ये ६६३ व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे.

लॉक संदर्भातील गुन्ह्यांतून साडेतीन कोटींचा दंड वसूलराज्यात  लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते ५ मे या कालावधीत  कलम १८८ नुसार  ९५,६७८  गुन्हे नोंद झाले असून १८,७२२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ५१ लाख ३८ हजार ६९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *