शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल अखेर जाहीर
पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 16 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल शुक्रवारी अखेर जाहीर झाला.
दरवर्षी जूनमध्ये या परीक्षेचा निकाल जाहीर होतो. यंदा करोनामुळे तब्बल चार महिने लांबणीवर पडला. विद्यार्थी, पालक, शाळा यांच्याकडून निकालाबाबत परीक्षा परिषदेकडे सतत विचारणा होत होती.
शाळांना आपल्या विद्यार्थ्यांचा निकाल त्यांच्या लॉगिनमधून तसेच पालकांना आपल्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगिनमधून 20 ऑक्टोंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे. गुणपडताणीचा निर्णय अर्ज दाखल झाल्यानंतर 30 दिवसांनंतर कळविण्यात येणार आहे. मुदतीत आलेल्या अर्जांचे अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.
विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, शहरी किंवा ग्रामीण, अभ्यासक्रम यात दुरुस्तीसाठीही शाळांच्या लॉगिनमधूनच ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहेत. अन्य कोणत्याही पद्धतीने अर्ज पाठविल्यास ते स्वीकारले जाणार नाहीत.
येथे पाहता येणार निकाल
www.mscepune.in
https://puppss.mscescholarshipexam.in