विशेष वृत्तवृत्तसेवा

SBIमध्ये नोकरी करण्याची नामी संधी:८ऑक्टोबर पर्यंत अर्जभरण्याची मुदत

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. पब्लिक सेक्टर मधील जगातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरी करण्याची नामी संधी चालून आली आहे.

२०२० या आर्थिक दृष्ट्या कठीण असलेल्या वर्षात ही बातमी जाहीर होणे म्हणजे वर्षानुवर्ष बँकेच्या परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या असंख्य व्यक्तींसाठी ही एक दिलासा देणारी गोष्ट आहे.

SBI मध्ये तुम्ही आता नोकरीसाठी अप्लाय करू शकता. ते सुद्धा तुमच्या घरात बसून ऑनलाईन पद्धतीने. ८ ऑक्टोबर २०२० पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे.
विशेष बाब म्हणजे या पदांसाठी अप्लाय करताना कोणती टेस्ट देण्याची गरज नाहीये.
यासंदर्भात जर का तुम्हाला कोणी fake कॉल करून पैसे भरण्याची मागणी केली तर त्यास बळी पडू नका.

स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत पत्रकात याबद्दल स्टेप्स नुसार माहिती दिली आहे. आपल्या अनुभव आणि पात्रतेला अनुरूप जागेला अप्लाय कसं करायचं त्यासाठी आधी प्रोसेस समजून घेऊयात :

१. SBI बँकेच्या http://bank.sbi/web/careers या लिंक वर जा.

२. या लिंकवर तुम्हाला Latest Announcement ही लिंक दिसेल.

३. या पोर्टल वर तुम्हाला तुमची बेसिक माहिती भरून रजिस्ट्रेशन करावं लागेल.

४. रजिस्ट्रेशन करण्यासाठी कोणतंही शुल्क नाहीये. तुम्हाला कोणत्याही एजंट ला त्यासाठी पैसे द्यायची गरज नाहीये.

५. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग ईन वर क्लिक करा.

६. भरती होणाऱ्या जागांची यादी तुम्हाला त्या लिंक वर दिसेल.

७. तुमच्या अनुभवानुसार योग्य त्या जागेवर क्लिक करा.

८. त्या जागेसंदर्भात काही माहिती तिथे दिली असेल आणि त्यासोबतच तुम्हाला काही प्रश्न विचारण्यात येतील. त्या प्रश्नांची योग्य माहिती तिथे लिहून तुमचा अर्ज सबमिट करा.

अप्लाय करताना तुमचे आधार कार्ड आणि शैक्षणिक प्रमाणपत्र स्कॅन स्वरूपात तुमच्या कम्प्युटर वर सहज सापडतील असे डेस्कटॉप वर आणून ठेवा म्हणजे तुमचा वेळ वाचेल.

SBI मध्ये भरती होणाऱ्या या पदांसाठी ७५० रुपये हे नाममात्र शुल्क आपल्याला भरावे लागणार आहे. हे शुल्क जनरल, EWS आणि OBC उमेदवारांसाठीच फक्त आकारण्यात आलं आहे.

तुम्ही जर का अनुसूचित जाती / जमाती / PWD यापैकी कोणत्या कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला विनाशुल्क या जागांसाठी अप्लाय करता येणार आहे.

वर सांगितल्या प्रमाणे प्रत्येक उमेदवाराला आवश्यक ती कागदपत्रे क्लिअर स्कॅन करून ऑनलाईन पद्धतीने SBI च्या वेबसाईटवर अपलोड करावे लागणार आहेत.

SBI च्या या ‘मेगाभरती’ कोणती पदं भरती होणार आहेत त्यांची यादी आणि संख्या खालीलप्रमाणे आहे:

१. डेप्युटी मॅनेजर सेक्युरिटी २८
२. मॅनेजर (रिटेल) ५
३. डेटा ट्रेनर १
४. डेटा ट्रान्सलेटर १
५. सिनियर कन्सल्टंट एनालिस्ट १
६. AGM (इंटरप्राइज अँड टेक्नॉलॉजी आर्किटेक्चर) १
७. डेटा प्रोटेक्शन ऑफिसर १
८. डेप्युटी मॅनेजर (डेटा सायंटिस्ट) ११
९. मॅनेजर (डेटा सायंटिस्ट) ११
१०. डेप्युटी मॅनेजर (सिस्टीम ऑफिसर) ५
११. रिस्क स्पेशलिस्ट सेक्टर (स्केल III) ५
१२. रिस्क स्पेशलिस्ट सेक्टर (स्केल II) ५
१३. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्पेशालिस्ट ३
१४. रिस्क स्पेशलिस्ट क्रेडिट (स्केल III) २
१५. रिस्क स्पेशलिस्ट क्रेडिट (स्केल II) २
१६. रिस्क स्पेशलिस्ट इंटरप्रायजेस (स्केल III) -१
१७. रिस्क स्पेशलिस्ट IND AS (स्केल III) ४

अप्लाय केल्यानंतर परीक्षेची तारीख जाहीर होईल आणि ती परीक्षा क्लिअर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत :

१. परीक्षेचा पॅटर्न आणि सीलॅबस व्यवस्थित समजून घ्या : हे केल्याने तुमच्या अभ्यासाला एक दिशा मिळेल. कारण, प्रत्येक पोस्ट चा परीक्षेचा पॅटर्न वेगळा असतो. तो संबंधित शिक्षकांकडून आधी समजून घ्या.

२. वेळेचं नियोजन करा : रोज किती वेळ आणि कोणत्या वेळेत स्पर्धे परीक्षेचा अभ्यास करणार आहात त्याचा टाईमटेबल तयार करा. ज्या विषयात जास्त तयारीची गरज आहे त्याला जास्त वेळ द्या.

पेपर वेळेत सोडवण्याकडे सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे.

३. स्पर्धा परीक्षा पुस्तक आणि ऑनलाईन रिसोर्सेस चा योग्य वापर करा : प्रत्येक विषयावर सध्या ऑनलाईन कंटेंट रोज अपलोड होत आहे. वेबसाईट्स, ब्लॉग्स अश्या बऱ्याच गोष्टी आहेत जिथून आवश्यक ती माहिती मिळू शकते.

मागच्या वर्षीचे पेपर्स आणि ebooks मधून सुद्धा तयारीसाठी मदत होऊ शकते.

४. स्टॉपवॉच ला मित्र करा : प्रत्येक वेळी पेपर सोडवताना स्टॉपवॉच चा वापर करा, कारण वेळ ही फार महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक प्रश्न solve करायला किती वेळ लागतो ते चेक करा. असं केल्याने मुख्य परीक्षेत वेळेमुळे टेन्शन येणार नाही.

५. मास्टर ट्रीक्स शिकून घ्या : लॉजिकल रिझनिंग सारख्या विषयासाठी काही टेक्निकस आहेत ज्या की खूप लोकांनी ऑनलाईन अपलोड केल्या आहेत. त्यांचा अभ्यास करा.

६. जास्तीत जास्त सराव करा : प्रत्येक विषयाबद्दल जास्त पेपर सोडवून सराव करा म्हणजे परीक्षा ही फक्त एक फॉर्मलिटी वाटेल.

७. रिविजन: प्रत्येक विषयाच्या शॉर्ट नोट्स तयार करा. परीक्षेला जातांना या नोट्स फार उपयुक्त पडतात. अवघड वाटणाऱ्या विषयांचा अभ्यास आधी सुरू करा.

८. वाचन वाढवा : न्यूजपेपर, राजकीय मॅगझिन, अर्थकारण, करंट अफेयर याबद्दल वाचन वाढवा.