बीड

बीड जिल्ह्यात आज 149 बरे झाले तर 153 पॉझिटिव्ह आढळले

बीड जिल्ह्यात (दि.4 ) रोजी जिल्ह्यात 153 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 835 स्वॅब तपासण्यात आले. यात 682 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत सध्या 2241 रुग्णांवर उपचार सुरू आहेत

आजच्या अहवालात अंबाजोगाई तालुक्यात 9, आष्टी 10, बीड 64, धारूर 13, गेवराई 16, केज 6, माजलगाव 10,परळी 16, पाटोदा 2,शिरूर 5 आणि वडवणी 2,असा रूग्णांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात एकूण 10583 बाधीत रुग्ण संख्या असून 7921 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर 2221 रुग्णांवर उपचार सुरू आहेत
बीड जिल्ह्यात 76.67 टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे तर आतापर्यंत 294 रुग्ण दगावले आहेत