एलपीजी गॅस, क्रेडिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स नियमांमध्ये आजपासून महत्वाचे बदल
नवी दिल्ली-एलपीजी गॅस, क्रेडिट कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आदींबाबत आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज एक ऑक्टोबरपासून ( 1 October 2020) केंद्र सरकारकडून नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले जाणार आहेत. ज्याचा थेट परीणाम जनसामान्यांवर होणार आहे. जसे की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (Pradhan Mantri Ujjwala Yojana) मध्यमातून देण्यात येणारी मोफत एलपीजी (Free LPG) गॅस कनेक्शन ही सेवा आजपासून (30 सप्टेंबर) बंद होत आहे. याशिवाय मिठाई दुकानदारांना वैधता संपलेली (Expiry Date) मिठाई विकता येणार नाही.
केडिट कार्ड (Credit Card) आणि वाहन चालवण्याचा परवाना (Driving License ) आदींबातही काही महत्त्वपूर्ण बदल केले होणार आहेत. त्यामुळे आजपर्यंत लागू असलेले नियम काय आहेत हे बदल घ्या जाणून.
वाहन चालवताना मोबाईल वापरास सवलत
केंद्र सरकारने वाहतूक नियमामत महत्त्वपूर्ण बदल करत वाहन चालवताना नियम व अटींचे पालन करुन मोबाईल वापरास परवानगी दिली आहे. नव्या नियमानुसार वाहन चालवतान नेविगेशन म्हणजेच रस्ता पाहण्यासाठी (दिशा, मार्ग) मोबाईलचा वापर करता येणार आहे. मात्र, मोबाईल वापरताना चालकाला वाहनावरील ताबा सुटणार नाही याकडे अधिक लक्ष द्यावे लागमार आहे. दरम्यान, वाहन चालवताना फोनवर बोलण्यास मात्र मनाई कायम ठेवण्यात आली आहे. वाहन चालवताना चालक जर मोबाईलवर बोलताना आढळला तर 1 ते 5 हजार रुपयांचा दंड आकारण्याचे प्रावधान या नियमांमध्ये आहे.
जुनी मिठाई विकण्यास बंदी
मिठाई विक्रेत्यांना यापुढे मुदत संपलेली म्हणजेच एक्सपायरी डेट संपलेली मिठाई विक्री करता येणार नाही. भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India) मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार एक्सापायरी डेट संपलेली मिठाई विकल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हा नियम एक ऑक्टोबरपासून लागू असणार आहे. एफएसएसएआईने संबंधित नियमांचे पालण करण्यााबत देशभरातील सर्व राज्यांना एक पत्रही लिहिले आहे.