ऑनलाइन वृत्तसेवा

आधारकार्ड सक्तीचे:ही १० कामेआधार कार्डशिवाय होणारच नाहीत

आधार कार्ड म्हणजे आपण भारतीय असण्याचा पुरावा आहे. आता प्रत्येक कामात आधार कार्ड सक्तीचे करण्यात आले आहे. एखाद्या कामानिमित्त गेलात आणि तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला परत पाठवण्यात येते या गोष्टीचा अनुभव तुम्ही घेतलाच असेल. पण आता अजिबात चिंता करू नका. आम्ही तुम्हाला अशी १० ठिकाणे सांगणार आहोत जिथे आधार कार्ड सक्तीचे आहे

या ठिकाणी जाताना सोबत ठेवा आधार कार्ड

बँकेत नवीन खाते सुरू करण्यासाठी आता आधार कार्ड अनिवार्य.
५० हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या बँकिंग व्यवहारासाठी आधार नंबर अनिवार्य
म्युच्युअल फंडच्या अकाउंटसाठीही आधार अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी सरकारने मुदत दिली आहे. जर आधार नंबर दिला नाही तर संबंधित खाते निष्क्रिय होईल.
मोबाइल नंबरसाठी ई – केवायसी : दूरसंचार मंत्रालयाने सर्व दूरसंचार कंपन्यांना सूचना दिल्या आहेत की, ग्राहकांच्या आधार कार्डच्या साहाय्याने ई व्हेरिफिकेशन करावे.
कोणताही कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढण्यासाठी आॅनलाइन अर्ज तेव्हाच करू शकतो जेव्हा त्याचा आधार नंबर ईपीएफशी जोडलेला असेल.
सरकारी स्कॉलरशिप मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले आधार नंबर बँक खात्यांशी जोडणे अनिवार्य आहे.
जर आपल्याला प्राप्तिकर रिटर्न दाखल करायचा असेल वा बँक खाते सुरू करायचे आहे, तर तुम्हाला आधार कार्डची गरज भासणार आहे. अनेक सामाजिक आणि सरकारी उपक्रमांसाठी आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. अन्य काही योजनांसाठीही लवकरच आधार बंधनकारक होणार आहे.
आपल्याकडे आधार कार्ड असल्यास प्राप्तिकर रिटर्न दाखल करण्यासाठी आधार कार्ड आपल्या पॅन कार्डशी लिंक करावे लागेल. आधारमुळे प्राप्तिकरचे ई-व्हेरिफिकेशन सोपे होईल.
वैयक्तिक दस्तऐवज संग्रहित (डिजिटल लॉकर) करण्यासाठी सरकारने आॅनलाइन लॉकर प्रणाली सुरू केली आहे. डिजीलॉकर सुरू करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य.
गॅस सबसिडीचा थेट हस्तांतरणाचा लाभ घेण्यासाठी सरकारने आधार नंबर आवश्यक केलेला आहे.
ईपीएफप्रमाणेच पेन्शन प्राप्त करण्यासाठीही आधार नंबर अनिवार्य करण्यात आला आहे. फसवणूक होऊ नये, यासाठी हे केले आहे.