बीड

बीड जिल्ह्यात 127 बरे झाले तर आज 146 पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात (दि.29 ) रोजी जिल्ह्यात 146 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 892 स्वॅब तपासण्यात आले. यात 746 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत

आजच्या अहवालात अंबाजोगाई तालुक्यात 27, आष्टी 21 , बीड 38, धारूर 8, गेवराई 6, केज 19, माजलगाव 6,परळी 7, पाटोदा 5,शिरूर 6 आणि वडवणी 3 ,असा रूग्णांचा समावेश आहे.

बीड जिल्ह्यात एकूण 9704 बाधीत रुग्ण संख्या आहे
बीड जिल्ह्यात 71.50 टक्के बरे होण्याचे प्रमाण आहे तर आतापर्यंत 268 रुग्ण दगावले आहेत