बीड

बीड जिल्ह्यातून गो करोना,करोना गो आतापर्यंत पाठवलेले सगळेच अहवाल निगेटिव्ह

बीड जिल्ह्याची ग्रीन झोनकडे वाटचाल

बीड/प्रतिनिधी

गेल्या 48 दिवसापासून सम्पूर्ण देशात लॉक डाऊन सुरु आहे,करोना विषाणूचा कहर अनेक जिल्ह्यात असला तरी बीड जिल्ह्यात मात्र एकच  पॉजिटीव्ह रुग्ण वगळता अजून तरी दुसरा रुग आढळून आला नाही आत्तापर्यंत 296 इतक्या संशयित रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवले त्यात सगळेच रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत ही बाब जिल्हा वाशियासाठी दिलसा देणारी आहे,जिल्हा प्रशासन, आरोग्य पोलीस प्रशासन परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहे तर नागरिक देखील या युद्धात एक सैनिक म्हणून आपले कर्तव्य बजावत आहे त्यामुळेच बीड जिल्ह्यातून गो करोना,करोना गो म्हणत हि लढाई सुरू आहे

करोना महामारीने जगालाच विळखा घातला त्यात महाराष्ट्र राज्यात मुंबई पुणे नागपूर,औरंगाबाद अशा मोठ्या शहरात बाधितांचा आकडा दिवसेदिवस वाढत आहे ही आकडेवारी चिंताजनक असून बिकट स्थिती निर्माण झालेली आहे बीड जिल्ह्यात प्रशासनाने अत्यंत कडक पाऊले उचलली ती जनतेच्या हिताचीच ठरू लागली आहे,जिल्हाधिकारी राहुल रेखावर,पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात,आरोग्य कर्मचारी पोलीस कर्मचारी,आणि महत्वाचे म्हणजे जिल्ह्यातील जनतेनेच या महामारीचा सामना कायम ठेवला आहे,गेल्या 48 दिवसात कधी नव्हे ते नागरिक घरातच बसून आहेत,व्यापारी दुकानदार छोटे व्यावसायिक नुकसान सहन करत मुकाबला करत आहेत,अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद आहे,एरवी बीड शहरात हजारोच्या संख्येने एकत्र जमणारा तरुण वर्ग देखील नियमांचे पालन करताना दिसतो आहे,म्हणूनच आपला बीड जिल्हा ग्रीन झोनकडे वाटचाल करत आहे,एकच अपवाद वगळला तर जिल्ह्यात एकही रुग्ण आजतरी नाही ही समाधानाची बाब आहे त्यामुळे बीडकरांचं कौतुक करावे तितके कमीच आहे अशीच साथ मिळत राहिली तर बीड जिल्ह्यातून गो करोना,करोना गो म्हणण्याचीही वेळ येणार नाही हे मात्र नक्कीच

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *