महत्वाची बातमी:फसवणुक होऊ नये म्हणून SBI ने दिला ग्राहकांना सल्ला
भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक होऊ नये म्हणून सतर्कतेचा इशारा दिला आहे. स्टेट बँकेच्या नावाने ग्राहकांना इमेल येत असून त्याद्वारे ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. या इमेल्सची रचना ही अगदी स्टेट बँकेच्या ऑफिशियल मेलसारखी असल्याने ग्राहक त्यांच्या जाळ्यात अडकू शकतात.
स्टेट बँकेने ट्विट करून त्यांच्याकडून असे इमेल पाठवले जात नसल्याचे सांगितले आहे. ‘काही फसवी माणसं ग्राहकांना इमेल पाठवत आहेत. ते इमेस एसबीआकडून पाठवल्यासारखे भासवतात. अशा इमेलची तक्रार या लिंकवर करा. कोणत्याही लिंकवर क्लिक करण्याआघी विचार करा’, असे स्टेट बँकेकडून सांगण्यात आले आहे.