केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन:कोरोनाची झाली होती लागण
नवी दिल्ली | केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. ११ सप्टेंबरला त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र अखेर त्यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांचे निधन झाले.
अंगडी यांनी स्वतः ट्विटद्वारे त्याबद्दल माहिती दिली होती. ‘आज माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी आता ठीक आहे. डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. गेल्या काही दिवसात जे माझ्याशी संपर्कात आले आहेत त्यांनी अधिकची काळजी घ्यावी. त्यांनीही क्वारंटाईन व्हावे, असे आवाहन केले होते.