आज 363 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज:बरे झालेल्यांची संख्या 6 हजाराच्या घरात
बीड जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण जेवढे आहे तेवढेच निगेटिव्ह होण्याचे प्रमाणही अधिक आहे आज 363 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात येत आहे
बीड जिल्ह्यातील रुग्ण संख्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमीच आहे जिल्ह्यातील आरोग्य प्रशासन कटाक्षाने लक्ष देऊन रुग्णांना उपचार करत आहेत आरोग्य कर्मचारी देखील मोठी मेहनत घेत आहेत रुग्ण संख्या कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नात आहे तर उपचार घेणाऱ्या रुग्णाकडून देखील सूचनांचे पालन केले जात आहे
जिल्ह्यातील सरकारी कोविड सेंटर बरोबरच खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण देखील मोठ्या संख्येने बरे होत आहेत आज जिल्ह्यातील कोविड सेन्टरमधून 363 रुग्ण बरे होऊन घरी जात आहे ही समाधानाची बाब आहे