पुणे

मराठी सुप्रसिद्धअभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन

मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं आज पहाटे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झालं आहे. ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेतील 27 जणांना कोरोनाची लागण झाली. यामध्ये आशालता या देखील मुख्य भूमिकेत होत्या. पण यादरम्यान 27 जणांना कोरोनाची लागण झाली. कोरोनाची लागण झाल्यामुळे आशालता यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. सोमवारी अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात होतं. पण अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.