देशनवी दिल्ली

नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी:या खात्यात तब्बल ३५,२०८ रिक्त पदे भरणार

RRB NTPC Recruitment 2020 : कोरोना व्हायरसच्या (Corona pandemic) संकटाच्या काळात जगभरात चहूकडे आर्थिक मंदी (economic recession) आहे आणि लाखो लोक आपल्या नोकऱ्या (jobs loss) गमावून बसले आहेत. अशा परिस्थितीत आता सर्वांनाच सुरक्षित आणि सरकारी नोकऱ्या (secure and government jobs) हव्या आहेत. आपणही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्याला भारतीय रेल्वेत (Indian Railways) नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी (job opportunities) मिळत आहे. RRB NTPCच्या ३५,२०८ पदांवर जागा रिकाम्या (vacancies in NTPC) आहेत.
भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर (details on official website) आपण याचे तपशील मिळवू शकता.

रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून मिळवा अधिक माहिती

इंडिया डॉट कॉमने दिलेल्या वृत्तानुसार रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाकडून या जागा पदवीधर आणि अंडरग्रॅज्यूएट उमेदवारांसाठी देण्यात आल्या आहे. यातील १०,६०३ पदांवर अंडर ग्रॅज्यूएट उमेदवार अर्ज करू शकतात. रेल्वेकडून ट्रॅफिक सिग्नलशी संबंधित पदांसाठी निघालेल्या या जागांसाठी उमेदवारांची वैद्यकीय तपासणीही करण्यात येईल.अधिक माहितीसाठी rrbonlinereg.co.in वर क्लिक करा.

काय आहेत उमेदवारांसाठी वयोमर्यादेच्या अटी?

रेल्वेकडून ट्रॅफिक सिग्नलशी संबंधित पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान १८ वर्षे असायला हवे तर कमाल वयोमर्यादा ३३ वर्षे ठरवण्यात आली आहे. या वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षे आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना पाच वर्षांची सूट देण्यात आलेली आहे.

पदवीधर उमेदवारांना ट्रॅफिक असिस्टंटच्या पदासाठी निवडले जाईल आणि यात त्यांना सातव्या वेतन आयोगाच्या आधारे चौथ्या दर्जानुसार ३५,४०० रुपये आणि ग्रेड पे पगाराच्या रुपाने दिले जाईल.

पगाराव्यतिरिक्त काय आहेत या नोकरीतून मिळणारे फायदे?

रेल्वे दरवर्षी हजारो लोकांना नोकरीची संधी देते आणि अधिकाधिक लोक यासाठी अर्ज करतात जेणेकरून एका चांगल्या नोकरीसह सुरक्षित भविष्यही मिळेल. निवड झालेल्या उमेदवारांना पगाराव्यतिरिक्त DA, HRA, ट्रान्सपोर्ट अलाऊंन्स, निवृत्तीवेतन तरतूदी, मेडिकल बेनेफिट्सही देण्यात येतील.