पीएफमध्ये केलेल्या गुंतवणूकीचे भविष्यात पाच फायदे:कोणते ते पहा
दरमहा आपली कंपनी आपल्या पगाराचा काही हिस्सा वजा करते, तो हिस्सा योगदान म्हणून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) खात्यात जातो. ईपीएफ, ज्याला पीएफ देखील म्हटले जाते, हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) द्वारा जमा केलेला निधी आहे.
आपण हा निधी त्वरित गरजा किंवा निवृत्तीनंतर वापरू शकता. ईपीएफओ कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतूदी अधिनियम 1952 च्या अंतर्गत स्थापन केलेली एक वैधानिक संस्था आहे.
लक्षात ठेवा की ईपीएफ कायद्यांतर्गत नोंदणीकृत कंपन्यांचेच कर्मचारी ईपीएफ किंवा पीएफमध्ये गुंतवणूक करु शकतात.
सेवानिवृत्तीसाठी बचत करण्याव्यतिरिक्त पीएफचे बरेच फायदे आहेत. आम्ही येथे या 5 मोठ्या फायद्यांविषयी आपल्याला माहिती देणार आहोत.
- कर बचत :- ईपीएफ कर वाचविण्यासाठी सर्वात सामान्य आणि चांगला पर्याय आहे. नवीन कर प्रणालीमध्ये कोणताही फायदा नाही. परंतु जुन्या कर प्रणालीमध्ये तुम्हाला पगाराच्या 12% दरापर्यंत करात सूट मिळेल. आयकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत ही बचत करातून सूट दिली आहे.
- सहा लाखांचा मोफत विमा :- जर ईपीएफओचा एखादा सदस्य नियमितपणे या निधीमध्ये योगदान देत राहिला तर त्याचा मृत्यू झाल्यास त्याचे कुटुंब विमा योजना 1976 (ईडीएलआय)चा लाभ घेऊ शकेल. या योजनेंतर्गत कुटुंबाला शेवटच्या मासिक पगाराच्या 20 पट अधिक रक्कम दिली जाते. ते जास्तीत जास्त 6 लाख रुपयांपर्यंत असू शकते. हा एक फ्री बेनेफिट आहे. यासाठी कोणतेही वेगळे पैसे लागत नाहीत.
- उच्च परतावा मिळतो :- आपल्या EPF खात्यात जमा केलेल्या पैशांवर आपल्याला उच्च परतावा मिळेल. आपण दरमहा जमा केलेल्या पैशांवर आपल्याला व्याज मिळते. दरवर्षी ईपीएफ व्याज दर ईपीएफओद्वारे जाहीर केला जातो. आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी ईपीएफवरील व्याज दर 8.5 टक्के जाहीर करण्यात आला आहे. परंतु यावेळी लोकांना दोन हप्त्यांमध्ये व्याजाचे पैसे मिळतील. पहिल्या हप्त्यात 8.15 टक्के आणि दुसऱ्या हप्त्यात 0.35 टक्के.
- सेवानिवृत्तीपूर्वी पैसे काढण्याची सुविधा :- साथीचे व बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने सेवानिवृत्तीपूर्वी काही पैसे काढण्याची सुविधा दिली आहे. म्हणजे आपण आपल्या पीएफ फंडामधून पैसे काढू शकता आणि आवश्यक वेळी ते वापरू शकता.
- पेन्शन योजना :- ही योजना पेंशन योजना 1995 (ईपीएस) अंतर्गत आजीवन निवृत्तीवेतन योजना देते. कंपनी आणि कर्मचारी दरमहा ईपीएफ खात्यात कर्मचार्यांच्या मूलभूत वेतन आणि महागाई भत्तेच्या 12 टक्के वाटा देतात. यात कंपनीचे योगदान वेगळे राहते.
- पुढे सरकारची काय योजना आहे ? :- Self Employed साठी सामाजिक सुरक्षा ही एक मोठी समस्या राहिली आहे आणि ईपीएफओचा विस्तार हे अंतर कमी करण्यात मदत करू शकेल. कामगारांविषयीच्या संसदीय स्थायी समितीने ही योजना व्यक्तिगत सब्सक्राइबर्ससाठी उपलब्ध करुन देण्याची सूचना केली होती. सरकारने याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता Self Employed ना पीएफ सेवा आणि सेवानिवृत्ती योजनेचा लाभही मिळेल.