SBI-खातेदारांसाठी महत्वाची बातमी:UPI ने व्यवहार करताय तर हे जाणून घ्या
नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : जर तुम्ही SBI म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI-State Bank of India) ग्राहक असाल तर आज तुम्हाला बँकेच्या काही सुविधांचा वापर करण्यात अडचण येऊ शकते. ग्राहकांच्या सोयी लक्षात घेऊन त्यांच्या चांगल्या अनुभवासाठी बँक आपल्या UPI platformमध्ये काही बदल करीत असल्याची माहिती बँकेने दिली आहे. यामुळे, बँकेच्या UPI ट्रान्जॅक्शन सेवेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बँकेने ग्राहकांना आवाहन केले आहे की, ते बँकेच्या अन्य डिजिटल चॅनेल जसे की SBIYONO, Yono light किंवा नेट बँकिंग सेवा व्यवहार किंवा इतर प्रकारच्या बँकिंगसाठी वापरू शकतात. या सेवांचा बँकेने केलेल्या अपग्रेडमुळे परिणाम होणार नाही.
UPI अंतर्गत मनी ट्रान्सफरमध्ये वाढ
UPI अंतर्गत मनी ट्रान्सफरमध्ये वाढ झाली आहे. UPI अॅप वापरणार्या लोकांना त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते त्याद्वारे कधीही पैसे ट्रान्सफर करू शकतात. विशेष गोष्ट अशी आहे की जर आपण याद्वारे पैसे ट्रान्सफर केले तर आपल्याला कोणालाही बँक खात्याबद्दल माहिती देण्याची गरज नाही. याद्वारे तुम्ही तुमचा मोबाईल फोन बिल, वीज बिल, ब्रॉडबँड बिल भरण्यासह अन्य सर्व आवश्यक कामेही करु शकता. SBI ग्राहक एकाच वेळी जास्तीत जास्त 10,000 आणि Yono light अॅपद्वारे एका दिवसात जास्तीत जास्त 25,000 रुपयांचा व्यवहार करू शकतात.
UPI ट्रानजॅकशन फेल झाल्यास काय करावे?
भारतीय स्टेट बँक (SBI ) UPI फंड ट्रान्सफर दरम्यान अनेक वेळा ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागतो. SBI ग्राहक Yono light अॅपद्वारे UPI सेवेचा लाभ घेऊ शकतात. UPI फंड ट्रान्सफर अयशस्वी झाल्यामुळे खात्यातून बर्याच वेळा पैसे जातात मात्र ट्रानजॅकशन होत नाही. एकदा ट्रानजॅकशन फेल झाल्यास आणि खात्यातून पैसे डेबिट झाल्यावर ही रक्कम आपोआप खात्यात परत येते. आपल्याला पैसे परत न केल्यास आपण Yono light अॅपवर तक्रार दाखल करू शकता. यासाठी तुम्हाला ‘Payment History’ या पर्यायावर जावे लागेल आणि ‘Raise Dispute’ वर जा. आणि आपल्याला येथे आपली तक्रार दाखल करावी लागेल.