बीडसह दहा जिल्हयात ऑरेंज अलर्ट:आजपासून चार दिवस मुसळधार पाऊस
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद या दहा जिल्हयांना हवामान विभागाने शुक्रवारी ऑरेंज अलर्ट दिला आहे.त्यामुळे या भागांत 60 ते 75 मिलिमिटर इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात थांबलेला पाऊस पुन्हा सक्रिय होत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वार्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटरने वाढला आहे. 19 ते 22 सप्टेंबर या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
दरम्यान, कोल्हापूर, पुण्यासह दहा जिल्ह्यांत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट पुकारला आहे. गेले आठ दिवस पावसाने राज्यात बहुतांश भागांत दडी मारली होती. त्यामुळे कमाल तापमानही वाढले होते.
हे वातावरण शनिवारपासून बदलणार आहे. हिमालयाच्या पायथ्यापासून तेलंगण, विदर्भ या भागात चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे.
तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाडा भागात 19 ते 22 सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पाऊस पडेल असा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.