पात्र शेतकऱ्यांचा अर्ज न स्विकारणाऱ्या बँक मॅनेजरवर होणार कारवाई:30 तारीख शेवटची
जिल्हयातील खरीप पिक कर्जासाठी पात्र शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत बँकांकडे अर्ज करावेत
बीड, दि. १८— जिल्हयातील खरीप पिक कर्जासाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांनी एकदाही कर्ज घेतलेले नाही, अशा जुन्या व ज्यांनी कर्ज घेतलेले आहे. व जे पुन्हा कर्ज घेण्यास पात्र आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांनी संबंधीत बँकेकडे खरीप पिक कर्ज मागणीसाठी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करावेत.जे शेतकरी ३० सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करतील अशा सर्व शेतक-यांचे अर्ज बँकांनी स्विकारावेत. जे बँक व्यवस्थापक अर्ज स्विकारणार नाहीत किंवा स्विकारण्यास टाळाटाळ करतील अशा बॅक व्यवस्थापका विरुध्द कडक कार्यवाही करण्यात येईल. तसेच ज्या शेतकऱ्यांनी व शेतक-यांची माहिती तलाठी व सोसायटी यांच्या मार्फत बँकेला दिलेली आहे. पात्र शेतकऱ्यांचे अर्ज संबंधीत बँकेकडे प्रलंबीत आहेत. अशा बँक व्यवस्थापकांनी पिक कर्जास पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाची कार्यवाही जलद गतीने करावी. यात हयगय करणा-या बँक व्यवस्थापकांवर नियमानुसार कार्यवाही अनुसरन्यात येईल, यांची गंर्भीर नोंद सर्व बँक व्यवस्थापकांनी घ्यावी. असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे
०००