बीड

कोरोनाचा कहर:बीड जिल्ह्यात आज 303 नवीन कोरोना पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात (दि.17 ) रोजी जिल्ह्यात 303 जणांना कोरोनाची लागण झाली असून आज एकूण 3348 स्वॅब तपासण्यात आले. यात 3045 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर उर्वरित 303 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
अंबाजोगाई तालुक्यात 20, आष्टी तालुक्यात 15, बीड 57, धारूर 51, गेवराई 17, केज 24, परळी 20, पाटोदा 61,माजलगाव 12, शिरूर 11 आणि वडवणी 15,असा रूग्णांचा समावेश आहे.

सध्या बीड जिल्ह्यात 7534 कोरोना बाधित संख्या असून 4874 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर 2457 जणांवर उपचार सुरू आहेत 24 तासातच 335 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आत्तापर्यंत 203 रुग्ण दगावले आहेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 64.69% आहे

error: Content is protected !!