लहान मुलांचे आधारकार्ड अपडेट करण्याबाबत महत्वाची सूचना:जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजच्या काळात सर्वात महत्त्वपूर्ण कागदपत्र म्हणजे आधार कार्ड आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीने आवश्यकतेनुसार वेळोवेळी आपले आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार आवश्यक असते, जसे डीबीटी, बँक खाते, पॅनकार्ड किंवा मालमत्ता नोंदणीच्या फायद्यांप्रमाणे सर्वांत उपयुक्त कागदपत्र आहे.
वयाच्या ५ व्या वर्षी आणि १५ व्या वर्षी अपडेट करणे आवश्यक आहे. यूआयडीएआयनुसार, नवजात मुलाचेही आधार कार्ड तयार केले जाऊ शकते. पण मुलांचे आधार कार्ड ५ वर्ष ते १५ वर्ष दोनदा अपडेट करणे महत्वाचे आहे.
या बदलास मुलांचे बायोमेट्रिक अपडेशन असे म्हणतात. त्यानुसार जर मुल ५ वर्षांचे असेल, तर त्याचे बायोमेट्रिक तपशील अपडेट केले जाते. त्याचप्रमाणे, मूल १५ वर्षांचे झाल्यावर देखील बायोमेट्रिक तपशील अपडेट करावे लागते.
असे करा मुलांचे आधार अपडेट
यूआयडीएआयने म्हटले आहे की, मुलांचे आधार अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तपशील अपडेटसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही जवळच्या आधार केंद्रावर जाऊन मुलांच्या आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक तपशील अपडेट करू शकता. जवळच्या आधार केंद्राची माहिती यूआयडीएआय वेबसाइटवर उपलब्ध आहे.
अशा प्रकारे बनवा मुलांचे आधार कार्ड
मुलाचे जन्म प्रमाणपत्र किंवा रुग्णालयाकडून दिलेले डिस्चार्ज कार्ड/ स्लिपद्वारे आधार सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही आपल्या मुलांचे आधार कार्ड बनवू शकता. पाच वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचे बायोमेट्रिक्स म्हणजेच फिंगरप्रिंट्स आणि डोळ्याच्या बुबुळांचे तपशील घेतले जात नाही. म्हणून ते नंतर अपडेट करणे आवश्यक असते.