आता पर्यंत 4 हजार बरे झाले:आज 115 करोना पेशंट घरी जाणार
उपचार घेत असलेल्या पेक्षा बरे झालेल्या पेशंटची संख्या आता जवळपास दुप्पट झाली आहे
आजही चांगली बातमी आहे 115 जण करोनामुक्त रुग्ण घरी जाणार आहेत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात अधिक आहे
आज जिल्ह्यात 115 तर एकूण 3977 जण कोरोनामुक्त झाले आहेत
आज जिल्ह्यातील 115 रुग्ण कोरोना मुक्त होत असून त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. या सर्वांना रुग्णालयातून सुटी देऊन घरी पाठविण्यात येत आहे. जिल्ह्यातील बाधीत संख्या 5914 असून 1760 रुग्णांवर उपचार सुरू आहेत सर्वाधिक रुग्ण बीडमध्ये बरे झाल्याची नोंद आहे
उपचार घेत असलेल्या पेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक झाली आहे ही समाधानाची बाब आहे आत्तापर्यंत बाधीत रुग्णापेक्षा 67.25 टक्के रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत मृत्यूचे प्रमाणही आता कमी झाले आहे