महाराष्ट्रमुंबई

EPFOचे व्याज दोन टप्प्यात मिळणार:कोट्यावधी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत केंद्राचा निर्णय

नवी दिल्ली : करोना संकट, आर्थिक घडी विस्कटलेली असून तिजोरीत खडखडाट झाला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कोट्यवधी कमर्चाऱ्यांना आणखी एक झटका दिला आहे. सरकारने २०१९-२० या वर्षासाठीचा कमर्चारी भविष्य निर्वाह निधीवरील (EPFO) व्याज दोन टप्प्यात देण्याचे ठरवलं आहे. २०१९-२० या वर्षासाठी ईपीएफओ सदस्यांना ८.५० टक्के व्याज मिळणार आहे. त्यातील ८.१५ टक्के तूर्त आणि नंतर उर्वरित ०.३५ टक्के व्याजाची रक्कम अदा केली जाणार आहे.
मंडळाची आज बुधवारी बैठक पार पडली. त्यात तूर्त ८.१५ टक्के व्याजदर देण्याचा निर्णय घेण्यात आला. याआधी मार्च महिन्यात २०१९-२० या वर्षासाठी ८.५० टक्के व्याजदर निश्चित करण्यात आला होता. मात्र मागील सहा महिन्यात सरकारची आर्थिक स्थिती बिकट बनल्याने ‘ईपीएफ’वर तूर्त ८.१५ टक्के व्याज देण्याचे ठरवण्यात आले.
महिन्यात भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून ईटीएफ विक्री करून सभासदांना देण्याची चर्चा या बैठकीत झाली. EPFO ने भांडवली बाजारात मोठी गुंतवणूक केली आहे. त्यातील काही गुंतवणूक काढून त्यातून उर्वरित ०.३५ टक्के व्याज डिसेंबरअखेर सभासदांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारने कोव्हिड-१९ संसर्गाशी मुकाबला करताना पैशांची चणचण भासू नये यासाठी अनेक उपाय योजले आहेत. त्यापैकी भविष्यनिर्वाह निधी योगदान तीन महिन्यांसाठी १२ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणून कर्मचाऱ्यांच्या हातात अधिक वेतन यावे अशी सोय केली होती. त्यातच लॉकडाउनच्या काळात ईपीएफओच्या सर्वच कार्यालयांतून सुरक्षित वावराचे सर्व निकष पाळून ५० टक्क्यांपेक्षा कमी कर्मचारी बळाच्या साह्याने कामकाज सुरू होते.