महाराष्ट्रमुंबई

ओरडून बोलल्याने कोरोना होतो,आम्ही रात्री नव्हे दिवसा ढवळ्या कामे करतो-मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला

मुंबई : ‘येत्या काळात प्रत्येक पाऊल शांततेने उचलावं लागणार आहे. ओरडून बोलल्याने कोरोना होतो, असे कालच वाचले. शॉर्टकट मारावे लागले की रात्री कामे करावी लागतात, आम्ही रात्रीची कामे दिवसा करायला लागलो, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना लगावला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेलं यंदाचं विधिमंडळाचे दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाची सांगता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भाषणाने करण्यात आली. या भाषणादरम्यान उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना अप्रत्यक्षरित्या अनेक टोले लगावले. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या टीका आणि टोल्यांनी हे दोन दिवसीय (7 आणि 8 सप्टेंबर) पावसाळी अधिवेशन संपलं.
येत्या 7 डिसेंबरला नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडेल.

‘राज्यात 15 सप्टेंबरपासून ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ अभियान राबवले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांकडून ‘चेस द व्हायरस कॅम्पेन’ची घोषणा करण्यात आली.’

‘मुंबईत जन्मलेली पहिली व्यक्ती महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभली हे मी माझं भाग्य समजतो. जनसंपत्तीसह वनसंपत्तीही महत्त्वाची आहे. जी काम करायची ती आम्ही दिवसा-ढवळ्या करतो, रात्रीच्या अंधारात नाही, रात्री चालणारी काम आम्ही दिवसाढवळ्या करत आहोत, बरोबर ना दादा,’ असे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांना म्हणाले.

‘सर्व पक्षांनी विरोधी पक्षाने शासनाला सहकार्य केले याबद्दल मी धन्यवाद देतो. मी महाराष्ट्रातील जनतेला धन्यवाद देतो हे संकट म्हणजे विषाणूबरोबरचं युद्ध आहे. रुग्णसंख्येतील वाढ आपण मर्यादित ठेवली. WHO ने सांगितलं आहे की, हे संकट इतक्या लवकर संपेल असं नाही. त्यामुळे यापुढे आपल्याला गाफील राहून चालणार नाही,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
प्रत्येक पाऊल दक्षतेने टाकावं लागेल. हिमाचल प्रदेशातील अध्यक्षांनी सदस्यांना सांगितलं की ओरडून बोलल्यामुळे कोरोना होतो. पुढच्या अधिवेशनात आपण हे पाळूया,’ असेही ठाकरे म्हणाले.

‘तोंडयाला पट्ट्या आल्या आहेत. सतत हात धूत आहोत, या सूचना तळागाळात पोहोचल्या पाहिजे. आपण अनलॉक करायला सुरुवात केली. आपण अनेक गोष्टी केल्या. सरकारने जबाबदारी पार पाडली,’ असेही ते म्हणाले.

शेतकऱ्यांना साडे 19 लाखांची कर्जमुक्त मिळाली. काम करताना इगो असता काम नये तसा शॉर्टकट मारु नये, असा टोला मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना लगावला.

‘आरे कार शेड जो काही खर्च झाला, तो वाया जाऊ देणार नाही. आरे विभाग हा संपूर्ण परिसर जंगल म्हणून घोषित केले आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.