24 तासात 8 जणांचा मृत्यू 90 कोरोनामुक्त, तर आज 173 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
बीड जिल्ह्यात आजच्या अहवालात 173 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात अधिक रुग्ण आढळत आहेत आजच 90 जण बरे होऊन घरी परतले आहेत
जिल्ह्यात आतापर्यंत 5572 जण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यात 4040 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या बीड जिल्ह्यात 1304 रूग्ण उपचार घेत आहेत.आज शनिवारी रोजी 90 रूग्णांना सुट्टी दिली आहे.
बीड जिल्ह्यात आतापर्यंत 166 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृत्युचा दर 2.97 एवढा आहे. तर रिकव्हरी रेट 72.50 एवढा आहे.
आतापर्यंत 68848 जणांची तपासणी करण्यात आली त्यात 63276 जणांचे अहवाल निगेटिव्ह निघाले आहेत
गेल्या 24 तासात 8 जणांचा मृत्यू झाला आहे