देशनवी दिल्ली

रेशनकार्ड अपडेट करून नवीन नाव समावेश करण्याची संधी

नवी दिल्ली : जर तुमचे रेशनकार्ड रद्द करण्यात आले असेल किंवा लिस्टमधून तुमचे नाव वगळले गेले असेल तर घाबरू नका. सरकार अशा लोकांना आणखी एक संधी देत आहे. राज्य सरकारांकडून नवीन रेशन कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेत काही लोकांची नावे वगळली गेली आहेत. ज्यांचे नाव वगळले गेले आहे ते आता पुन्हा आपले नाव जोडू शकतात.

अनेक कारणांमुळे रेशनकार्डमधून नाव वगळले जाते. जसे की, तुमचे नाव दुसर्‍या रेशनकार्डमध्ये अगोदरपासून असणे, आधारकार्डचा नंबर तुमच्या रेशन कार्डशी जोडलेला नसणे, तुमच्या रेशनकार्डच्या प्रमुखाचा मृत्यू झालेला असेल तरी रेशन कार्डमधून नाव वगळले जाऊ शकते. अशा स्थितीत रेशनकार्डसाठी पुन्हा अर्ज करून ते बनवू शकता.
यासोबतच लग्नानंतर पत्नीचे आणि मुलांच्या जन्मानंतर त्यांची नावे सुद्धा जोडू शकता.

असे बनवा पुन्हा रेशन कार्ड
जर रेशन कार्डमधून एखाद्या व्यक्तीचे नाव वगळले गेले असेत तर त्याचे आधार कार्ड आणि आपले नाव ज्या रेशन कार्डमध्ये जोडायचे आहे, त्या कार्डची कॉपी घेऊन जवळच्या सीएससी केंद्रात किंवा जन सुविधा केंद्रात जाऊन आपले नाव जोडू शकता. तेथून तुम्हाला जी रिसिट मिळेल ती आपल्या तहसिलमध्ये जमा केल्यानंतर काही दिवसानंतर तुमच्या रेशनकार्डात त्या व्यक्तीचे नाव जोडले जाईल.

रेशन कार्डात नवे नावसुद्धा टाकू शकता
तुम्ही तुमच्या रेशन कार्डात नवीन सदस्याचे नाव सुद्धा टाकू शकता. नव्या सदस्याचे नाव टाकण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली, नवीन जन्माले येणारे मुल आणि दुसरी पत्नी विवाहानंतर दुसर्‍या कुटुंबात येते.

लग्नानंतर असे तयार करा नवीन रेशनकार्ड
तुम्हाला तुमच्या पत्नीचे नाव रेशन कार्डमध्ये जोडायचे असेल तर तुमच्याकडे दोन ऑपशन आहेत. पहिला, सर्वप्रथम दोघांनी वेगवेगळे रेशन कार्ड बनवावे किंवा पत्नीच्या आधारकार्डमध्ये दुरूस्ती करून घ्यावी. आधार कार्डमध्ये मुलीच्या वडीलांच्या नावाऐवजी पतीचे नाव नोंदवा. यानंतर आपले आणि पत्नीचे आधार कार्ड घेऊन जा आणि तहसिलमध्ये पुरवठा अधिकार्‍यांला द्या. तुमचे नाव अगोदरपासून नाव असलेल्या रेशनकार्डमधून काढून घ्या आणि नंतर नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करा.

पत्नीचे ऑनलाइन सुद्धा जोडू शकता नाव
ज्या रेशनकार्डसोबत तुमचे नाव जोडलेले आहे आणि तुम्हाला तुमच्या पत्नीचे नाव सुद्धा त्या रेशनकार्डमध्ये टाकायचे असेल तर तुमच्या पत्नीच्या आधार कार्डात दुरूस्ती करून घ्या. यानंतर पत्नीचे आधार जन सुविधा केंद्रावर जाऊन जमा करा आणि ऑनलाइन व्हेरिफिकेशननंतर पत्नीचे नाव जोडले जाईल.