बीड

82 जण कोरोना मुक्त तर आज 198 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

बीड जिल्ह्यात आजच्या अहवालात 198 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात अधिक रुग्ण आढळत आहेत आजच 82 जण बरे होऊन घरी परतले आहेत

जिल्ह्यात आतापर्यंत 5216 जण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यात 3859 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या बीड जिल्ह्यात 1209 रूग्ण उपचार घेत आहेत.आज शनिवारी रोजी 82 रूग्णांना सुट्टी दिली आहे.
बीड जिल्ह्यात आतापर्यंत 148 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मृत्युचा दर 2.83 एवढा आहे. तर रिकव्हरी रेट 73.98 एवढा आहे.
आतापर्यंत 67843 जणांची तपासणी करण्यात आली त्यात 62627 जणांचे अहवाल निगेटिव्ह निघाले आहेत