आधारमध्ये ऑनलाइन पत्ता कसा अपडेट करणार:महत्वाची माहिती
आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आपल्या आधार यूजर्ससाठी विस्तृत सुविधा प्रदान करते. केवळ UIDAI च कोणाच्याही आधारात बदल, अपडेशन किंवा करेक्शन करण्यास अनुमती देते. मात्र, आधारमध्ये कोणतीही माहिती अपडेट करण्यासाठी यूजर्सना व्हॅलिड डॉक्युमेंट देणे बंधनकारक आहे. आधारमध्ये पत्ता बदलण्यासाठी UIDAI 44 इतर डॉक्युमेंटस एक्सेप्ट करतो. या 44 डॉक्युमेंटसपैकी एक म्हणजे बँक पासबुक. अशा परिस्थितीत, जर आपल्याला आपल्या आधारमधील पत्ता बदलायचा असेल तर आपल्या बँक पासबुकसह देखील केले जाईल. आपला फोटो या बँकेच्या पासबुकमध्ये संलग्न केलेला असणे आवश्यक आहे तसेच त्यावर बँक अधिकाऱ्याची सही देखील असली पाहिजे.
UIDAI ने एका ट्वीटद्वारे आधार कार्डधारकांना याबाबत माहिती दिली आहे.
UIDAI ने या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘तुम्हालासुद्धा बँक पासबुकच्या मदतीने आधारमध्ये पत्ता अपडेट करायचा आहे? जर अशी स्थिती असेल तर पहिले आपल्या बँकेच्या पासबुकमधील फोटो बँकेने स्टॅम्प्ड केला आहे का तसेच त्यावर बँक अधिकाऱ्याची स्वाक्षरी आहे का याची खात्री करा. त्याशिवाय हे बँक व्हॅलिड डॉक्युमेंट मानले जाणार नाही. UIDAI 44 इतर डॉक्युमेंटसद्वारे आधारमध्ये पत्ता अपडेट करते
https://platform.twitter.com/embed/index.html?dnt=false&embedId=twitter-widget-0&frame=false&hideCard=false&hideThread=false&id=1301413292670214147&lang=en&origin=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F&theme=light&widgetsVersion=219d021%3A1598982042171&width=550px
इतर कोणत्या डॉक्युमेंटसद्वारे आधार कार्डमधील पत्ता बदलू शकतो ?
पासपोर्ट, रेंट अॅग्रीमेंट, बँक स्टेटमेंट किंवा पासबुक, ड्रायव्हिंग लायसन्स, टेलिफोन बिल, विजेचे बिल, पाणी बिल, मतदार ओळखपत्र या मदतीने तुम्ही तुमच्या आधार कार्डमधील पत्ता बदलू शकता. या सर्व 44 डॉक्युमेंटसची माहिती UIDAI वेबसाइटवर देण्यात आली आहे.
आधारमध्ये ऑनलाइन पत्ता कसा अपडेट करावा
सर्वप्रथम UIDAI ची वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा. येथे आपल्याला My Adhaar नावाने एक टॅब सापडेल. ड्रॉपडाउनच्या दुसऱ्या टॅबमध्ये Udate Your Aadhaar वर जा आणि तीसरा ऑप्शन Update your address online वर क्लिक करा.
त्यावर क्लिक केल्यास नवीन पेज उघडेल. आपण येथे खाली जाताना, Proceed to Update Address वर क्लिक करा. यानंतर एक पेज पृष्ठ उघडेल.
या पेजवर पहिले आपला आधार क्रमांक, कॅप्चा व्हेरिफिकेशन भरा आणि खाली Send OTP वर क्लिक करा. आता आपल्या आधार रजिस्टर्ड क्रमांकावर एक OTP येईल.
तो OTP एंटर करा. OTP एंटर केल्यावर तुम्हाला Data Update Request वर क्लिक करावे लागेल.त्यानंतर अॅड्रेस ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा पत्ता बदलला जाईल.